श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Swami Samarth Tarak Mantra | tarak mantra lyrics |shri swami samarth mantra

Photo of author

By Team Master Marathi

Swami Samarth Tarak Mantra in Marathi

shree swami samarth tarak mantra

Swami Samarth Tarak Mantra : मनुष्य जीवन म्हटलं कि सुखा नंतर दुःख आणि दुःखा नंतर सुख हे आयुष्य भर सुरूच असते. मनुष्य जीवन म्हंटल कि असे भोग भोगावेच लागतात. त्यापासून सुटका कुणाची झाली नाही. अगदी त्यापासून परमेश्वराची पण सुटका झाली नाही. अश्या संघर्ष्यातून बाहेर येण्यासाठी आणि जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मनुष्य कार्यरत असतो. त्यासाठी मनुष्य आपल्या आराध्य देवतांचे नास्मरण, उपासना करावे असे म्हटले जाते. 

तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा पूर्ण अर्थ आहे. मनुष्य जीवन जगात असताना जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे. त्यांना सर्वाना तारण्यासाठी स्वामी समर्थ  उपाय करत असतात स्वामीनी तारक मंत्र देऊन मनुष्याला अनमोल अशी  भेट दिली आहे.

swami samarth mantra

।। श्री स्वामी समर्थ ।

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।

अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,

परलोकी ही ना भीती तयाला

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,

वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।

जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,

कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।

आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,

नको डगमगु स्वामी देतील हात

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,

स्वामीच या पंचामृतात।

हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,

ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Shree Swami Samarth Tarak Mantra Video

Leave a Comment