Swami Samarth Quotes In Marathi : स्वामी समर्थ स्टेटस मराठी

Photo of author

By Team Master Marathi

Swami Samarth Quotes In Marathi : ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्त्तांचा रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामीं समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात असा विश्वास भक्तांना आहे. जीवन जगात असताना जीवनाचे सारे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये . स्वामीं समर्थांचे हे विचार भक्तांच्या जीवनातील समस्यां नष्ट करतात. असेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामीं समर्थांचे जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे कोट्स आपण पाहूया. 

1.Swami Samarth Quotes | स्वामी समर्थ कोट्स

Swami Samarth Quotes In Marathi

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. – श्री. स्वामी समर्थ 🙏

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

 तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. – श्री. स्वामी समर्थ 🙏

जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

2.Swami Samarth Suvichar In Marathi | स्वामी समर्थ सुविचार मराठी

Swami Samarth Quotes In Marathi

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. – श्री. स्वामी समर्थ 🙏

 गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. – श्री. स्वामी समर्थ 🙏

नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. – श्री. स्वामी समर्थ 🙏

नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास. – श्री. स्वामी समर्थ 🙏

येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला ही येण्यासाठी विचार करावा लागेल. – श्री. स्वामी समर्थ 🙏

कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. – श्री. स्वामी समर्थ 🙏

सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

 उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. – श्री. स्वामी समर्थ 🙏

असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. – श्री. स्वामी समर्थ 🙏

3.Swami Samarth Thoughts In Marathi | स्वामी समर्थांचे विचार मराठी

Swami Samarth Quotes In Marathi

 जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. – श्री. स्वामी समर्थ 🙏

‘मी’पणा सोडा मोठे व्हाल. – श्री. स्वामी समर्थ 🙏

श्रम करा सुख मिळेल. – श्री. स्वामी समर्थ 🙏

ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे. – श्री. स्वामी समर्थ 🙏

संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात. – श्री. स्वामी समर्थ 🙏

मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. – श्री. स्वामी समर्थ 🙏

 मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठिशी आहे. – श्री. स्वामी समर्थ 🙏

तू कर मत फिक्र, जो हुआ नही मैं करूंगा वो जो तूने सोचाही नहीं. – श्री. स्वामी समर्थ 🙏

 हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. – श्री. स्वामी समर्थ 🙏

4.Swami Samarth Status In Marathi | स्वामी समर्थ स्टेटस मराठीत

Swami Samarth Quotes In Marathi

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. – श्री. स्वामी समर्थ 🙏

जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. – श्री. स्वामी समर्थ 🙏

क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. – श्री. स्वामी समर्थ 🙏

ब्रम्हांडनायक. – श्री. स्वामी समर्थ 🙏

आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींंवर निःशंक सोपवा. कर्म करता राहा. फळ मिळणारच. – श्री. स्वामी समर्थ 🙏 

भेटून तर सर्व जण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. – श्री. स्वामी समर्थ 🙏

वाईट व्यक्ती अनुभव देते, तर चांगली व्यक्ती साथ देते. – श्री. स्वामी समर्थ 🙏

जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. – श्री. स्वामी समर्थ 🙏

स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की
कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. – श्री. स्वामी समर्थ 🙏

शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते. – श्री. स्वामी समर्थ 🙏

प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये. – श्री. स्वामी समर्थ 🙏

Leave a Comment