श्रावण सोमवार मराठी माहिती महत्त्व  व्रत कथा शिवमूठ मंत्र पूजा विधी 2023 | Shravan somvar information 2023 katha shivmuth puja vidhi 2023 | श्रावण सोमवारच्या शुभेच्छा

Photo of author

By Team Master Marathi

श्रावण सोमवार मराठी माहिती व्रत कथा शिवमूठ मंत्र पूजा विधी 2023 | Shravan somvar information 2023 katha shivmuth puja vidhi 2023 श्रावण सोमवारच्या शुभेच्छा.

श्रावण सोमवार मराठी माहिती महत्त्व  व्रत कथा शिवमूठ मंत्र पूजा विधी 2023 | Shravan somvar information 2023 katha shivmuth puja vidhi 2023 श्रावण सोमवारच्या शुभेच्छा. नमस्कार सर्वप्रथम आपले या मास्टर मराठी वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आजच्या या लेखामध्ये आपण श्रावण सोमवार विषयी थोडक्यामध्ये माहिती देणार आहोत. श्रावण सोमवार कधीपासून सुरु होणार आहे आणि  प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमुठ कुठली  आहे आणि यावर्षी  श्रावण सोमवार कधी संपणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती आपण आजच्या या  लेखांमध्ये बघणार आहोत. तुम्हां सर्वाना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. 

श्रावण सोमवार महत्त्व 2023

भारतीय पंचांगात विशेषता महाराष्ट्र मध्ये चतुर्मासात एक खूप महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे श्रावण सोमवार .या श्रावण महिन्यात स्त्रिया सोबतच कुमारिका सुद्धा हे श्रावण सोमवारचे व्रत खूप श्रद्धेने करतात. असे म्हटले जाते की श्रावण सोमवार मधील पाचही सोमवार महादेव / शंकराची पूजा केल्यास इच्छुक अशी  फल प्राप्ती होते त्यामुळेच आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका हे व्रत करतात अशी आख्यायिका आहे. हिंदू धर्मातील श्रावण महिना हा पाचवा महिना हा सण पावसाळ्यात येत आल्यामुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न करणारे असते त्यामुळेच श्रावण महिना हा भगवान शिव यांना खूप प्रिय आहे या महिन्यात भगवान महादेवाची पूजा केल्यावर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

श्रावण सोमवारची कथा व्रत 2023 – Shravan Somvar Katha

शंकरजी  हाच आपला प्रत्येक जन्मी पती म्हणून मिळावा असे देवी सतीने प्रण केले होते , त्याच्या अगोदर देवी सतीने आपल्या पिताश्री दक्ष यांच्या घरी योगशक्तीने स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता आणि पुढच्या जन्मात  देवी सती ने पार्वती रुपात राणी मैना यांच्या घरात जन्म घेतला. पार्वतीने मागील जन्मी भगवान शंकर हेच पती मिळावे म्हणून प्रण केला होता आणि त्यासाठी तिने या जन्मात सुद्धा भगवान शिव पती मिळावा म्हणून निरंकार राहून कठोर व्रत केले व भगवान शिव यांना प्रसन्न केले व त्यानंतर शिव प्रसन्न होऊन पार्वती बरोबर विवाह केला अशी इतिहासात आख्यायिका आहे म्हणूनच प्रत्येक श्रावण  सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा असे केल्यास आपल्यास  सौभाग्य प्राप्त होते आणि कुमारिकेंना इच्छुक असा  पती मिळतो.

श्रावण सोमवारची कथा वृत्त 2023 pdf

श्रावण सोमवार शिवामूठ 2023 – आजची शिवामूठ 2023 

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून सर्व कामे आटपून भगवान महादेवाचे नामस्मरण जप आणि उपवास केला जातो .श्रावण सोमवारी  महादेवाला दुधाचा दुग्धाभिषेक केला जातो आणि त्याचे पूजन केले जाते व नंतर विशेष शिवमूठ वाहतात.

शिवामूठ मंत्र मराठीत – shivamuth mantra in marathi 2023

नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।

शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।

आजची शिवामूठ कोणती आहे ? Aajchi shivamuth in marathi

श्रावण सोमवारतारीखशिवामूठ
1पहिला श्रावण सोमवार21 ऑगस्ट 2023तांदूळ
2दुसरा श्रावण सोमवार28 ऑगस्ट 2023तीळ
3तिसरा श्रावण सोमवार04 सप्टेंबर 2023मूग
4चौथा श्रावण सोमवार11 सप्टेंबर 2023जवस

श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 (Happy Shravan Maas)

महादेवाला करूनि वंदन वाहते बेलाचे पान 

महादेवा सदैव सुखी ठेव रे  माझ्या प्रियजनांना 

श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश मराठी 2023 ( shravan somvar shubhechha in marathi )

ज्याने घेतले मनापासून चं नाव,

त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव.

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

shravan somvar quotes in marathi ( happy shravan somvar)

दुःख दारिद्रय नाश होवो

सुख समृद्धी दारी येवो

या श्रावण सोमवारच्या

शुभ दिनी  तुमच्या सर्व

मनोकामना पुर्ण होवो.

shravan somvar status

ज्याने घेतले मनापासून भगवान शंकराचं नाव,

त्यावर भगवान शंकराने केला सुखांचा वर्षाव.

श्रावणी सोमवारच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!

Q.श्रावण मास कधी आहे मराठी २०२३?

१७ ऑगस्ट २०२३ पासून मराठी श्रावण सोमवार हा सुरू होत आहे आणि ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत  संपणार आहे.

Q.या वर्षी २०२३ किती श्रावण सोमवार आहेत ?

एकूण ४ श्रावण सोमवार  २०२३ वर्षात आहेत.

Q. २०२३ या वर्षी श्रावण सोमवार शिवामूठ कोणत्या आहेत ?

या २०२३ वर्षी शिवामूठ – तांदूळ पहिल्या श्रावण सोमवार ची ( २१ ऑगस्ट २०२३) आहे,  शिवामूठ – तीळ दुसऱ्या श्रावण सोमवार ची (२८ ऑगस्ट २०२३) आहे,शिवामूठ – मूग तिसऱ्या श्रावण सोमवार ची (०४ सप्टेंबर २०२३) आहे,शिवामूठ – जवस चौथ्या श्रावण सोमवार ची ( ११ सप्टेंबर २०२३) आहे,

Leave a Comment