ऋषि पंचमी संपूर्ण माहिती – Rishi Panchami Information In Marathi

Photo of author

By Team Master Marathi

Rishi Panchami Information In Marath | ऋषि पंचमी माहिती मराठी । Rishi Panchami Vrat 2023 | Rishipanchami | ऋषि पंचमी | ऋषि पंचमी व्रत मराठी | Rishi Panchami Information । ऋषि पंचमी व्रत कथा । ऋषी पंचमी मंत्र | rishi panchami chi mahiti

Rishi Panchami Information In Marathi

ऋषि पंचमी संपूर्ण माहिती : Rishi Panchami Information In Marathi

सणाचे नाव – ऋषि पंचमी
मराठी महिना –भाद्रपद
तिथी –शुक्ल पंचमी
समर्पित –सप्तर्षी
दिनांक –२० सप्टेंबर २०२३
ऋषींची नावे –गौतम महर्षी, जमदग्नी आणि वशिष्ठ कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र

हिंदू धर्मामध्ये अनेक असे सण साजरे केले जातात अश्या या अनेक सणांपैकी महत्वाचा सण म्हणजे ऋषिपंचमी. या सणाला व्रत केले जाते. भाद्रपद पंचमीच्या दिवशी हे व्रत साजरे केले जाते. ऋषी बद्दल आपल्याला कृतज्ञा तर असतेच अश्या इतिहासातील ऋषी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो. ऋषिपंचमी सण कशा पद्धतीने साजरा करतो? ह्या सणाचे महत्व काय आहे? आणि कथा आणि पूजा विधी कश्या प्रकारे केली जाते ? याविषयीची सविस्तर माहिती या लेखात देणार आहोत. चला तर मग, पाहूयात ऋषिपंचमीची संपूर्ण माहिती .

ऋषिपंचमी सण म्हणजे काय? (Meaning Of Rishi Panchami)

भाद्रपद या मराठी महिन्यामध्ये शुक्ल पंचमी ला जे व्रत केले जातात त्याला ऋषिपंचमी सण असे म्हटले जाते. गणपती बाप्पाचे आगमन म्हणजेच गणेश चतुर्थी च्या दुसऱ्या दिवसाला ऋषिपंचमी हा सॅन साजरा केला जातो.या दिवशी इतिहासातील महान थोर झालेल्या ऋषींची पूजा केली जाते .या पूजेमध्ये गौतम महर्षी, जमदग्नी आणि वशिष्ठ कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र अश्या अनेक ऋषींची पूजा केली जाते. या दिवशी सात सुपाऱ्या ठेवून ऋषीची पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाने कमावलेले अन्न न खाता स्वकष्टाने कमावलेलं अन्न खाल्ले जाते.या उद्देश म्हणजे किमान वर्षेतून एकदा तर स्वतःच्या कष्टाने पिकवलेले अन्न खावे हा होतो. इहितासातील ऋषींनी सांगितलेल्या रीती रिवाज ज्ञान चिंतन मनन हे पुढच्या पिढीने लक्षात ठेवावे म्हणून हा सण साजरा केला जातो.

ऋषी पंचमी या सणाचे महत्व असे आहे कि या सणाचे व्रत केल्याने महिलांच्या सर्व दोषांचे निराकरण होते. या सणाला महिला, कुमारिका तसेच पुरुष देखील उपवास करतात. याच दिवशी दीड दिवसांच्या गणपती रायांचे सुद्धा विसर्जन होते.

ऋषीपंचमी च्या दिवशी काय दान करावे

या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी दान केल्याने त्याचे परिणाम दिसून येतात असे म्हटले जाते. म्हणून या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी दान करावे. दान करताना कुठल्याही ब्राह्मणाला साखर, तूप, केळी दान करावी. तसेच त्यांना दक्षिणाही दान करू शकतो.

ऋषीपंचमी 2023 कधी आहे ? Rishi Panchami 2023 date

२०२३ यावर्षी ऋषीपंचमी हा सण बुधवार २० सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरी होणार आहे.

पूजेची वेळ

सकाळी ११.०१ वाजून ते दुपारी ०१.२८ पर्यंत
कालावधी ०२ तास २७ मिनिटे

हे देखील जाणून घ्या :  गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

हे देखील जाणून घ्या :  हरतालिका संपूर्ण माहिती

ऋषीपंचमी सणासाठी लागणारे पुजा साहित्य

ताम्हण, पळी, पंचपात्र, निरांजन, माचिस, कापूस, कापूर, धूप, मातीचा दिवा, केळीची पाने, नारळ, फुल, फळे, अगरबत्ती, विड्याची पाने, सुपारी, सुटे पैसे,मातीचा कलश, पंचामृत, तांदुळ, दुध, दही, तुप, हळद, लवंग, विलायची,किशमिश, काजु आणि सात प्रकारचे नैवैद्य, दहा बदाम आंब्याची पाने, पीठ , केळी आठ, गायीचे शेण, गोमुत्र, गाईचे दूध.

पूजा विधी कसा करावा

सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे आणि अंघोळ करून नवे कपडे परिधान करावे

पूजेचे सर्व साहित्य आणून देवाची पूजा करावी नंतर गणेशाची पूजा करावी

हळदीने चौरस तयार करून सात ऋषींची स्थापना करावी

तसेच सात ऋषींना जनावे घालावे

यानंतर ऋषींना हळद कुंकू वाहून फुले वाहावे

तसेच घरात धुपारती करावी आणि पंचामृताचा नैवद्य द्यावा, तसेच फळे आणि गोड नैवैद्य द्यावा

सप्तऋषींची व्रतकथा वाचन करावे नंतर आरती करून प्रसाद वाटावे

उत्तर पूजा झाल्यानंतर अक्षता वाहून विधीवत सप्त ऋषींच्या मूर्तींचे विसर्जन करावे.

सात वर्ष हे व्रत पूर्ण केल्यावर आठव्या वर्षी मातीच्या सात ऋषी च्या मूर्ती बनवाव्या त्यामध्ये कुठल्याही वनस्पतीच्या बिया टाकाव्या.

त्यानंतर कलशाची स्थापना करून पूजा करावी

Leave a Comment