OBC Full Form In Marathi | ओबीसी म्हणजे काय?

Photo of author

By Team Master Marathi

OBC Full Form In Marathi : सर्वप्रथम नमस्कार ,या लेखामध्ये, आम्ही तुम्हाला OBC पूर्ण फॉर्म आणि OBC शी निगडित माहिती सांगनार आहे मित्रांनो आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे  जाती आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. तसेच आपला  देशात अनेक जातीं आणि धर्मा मध्ये लोकांना विभागले गेले आहे. आज आपण या लेखात जाणून घेणार आहे ओबीसी म्हणजे काय?

ओबीसी म्हणजे काय? (OBC Meaning)

ओबीसी म्हणजे इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (Other Backward Class) असे म्हंटले जाते. या ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश होतो. हा प्रवर्ग सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये  कलम 16 (4 आणि 340) मध्ये ओबीसीचे मूळ आहे जिथे ते OBC च्या मागासवर्गीय लोकसंख्येच्या नावाने दिले आहे.

भारतीय राज्यघटने मध्ये ओबीसीं प्रवर्गाला  सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासवर्गीय असे आहे. 27 टक्के ओबीसीं प्रर्गाला सार्वजनिक क्षेत्रामधील  नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात आरक्षण दिले गेले आहे.

मंडल आयोगाच्या 1979 मध्ये केलेल्या शिफारशीनुसार या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात येणाऱ्या समाजाचा समावेश करण्यात आला होता. ओबीसी प्रवर्गातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मंडल आयोगाने 1990 मध्ये व्ही.पी. सिंग यांच्या सरकारच्या शिफारशींवरून दिला होता.

फुल फॉर्म ओबीसी चा काय आहे (OBC Full Form in Marathi)

ओबीसी चा फुल फॉर्म हा   Other Backward Class  आहे आणि मराठी मध्ये फुल फॉर्म म्हटले तर इतर मागास वर्ग आहे . मंडळ आयोगाने ओबीसी जातींची संख्या देशात आणि राज्यात वेगवेगळी नोंदवली आहे ,जसे कि महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या 360 आणि  देशात ओबीसी जातींची संख्या 3744 इतकी नोंद केलेली आहे. राष्ट्रीय आयोगाने इतर मागासवर्गीयांसाठी  2171 प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे.

ओबीसी मधील असलेल्या  जाती (OBC Caste in Marathi)

कुणबी, तेली, साळी, कोष्टी, जंगम, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी,, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, सोनार, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक प्रकाराच्या जाती ओबीसी या प्रवर्गामध्ये येतात .

ओबीसी मधील लोकांना मिळणारे लाभ

सरकारच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील लोकांना अनेक प्रकारचे लाभ दिले जातात, जसे की या ओबीसी वर्गातील लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण दिले जाते, तसेच या वर्गातील लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये वयात सूट दिली जाते.

ओबीसी प्रवर्गातील मुलांना शाळा आणि कॉलेज मध्ये शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो जेणेकरून मुलांना त्यांच्या अभ्यासाविषयी  लागणारे साहित्य खरेदी करता येईल आणि कुटुंबावर कुठल्याही प्रकारचा भार पडणार नाही.

ओबीसी चे इतर प्रकारचे  फुल फॉर्म (Other full form of OBC in Marathi)

Oriental Bank of Commerce – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स

Outer Backward Caste – बाह्य मागास जात

प्रश्न वारंवार विचारले जाणारे (FAQ)

इतर मागासवर्गीय म्हणजे काय?

इतर मागासवर्गीय म्हणजे  भारतामधील  सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित समुदायांचा एक गट आहे. 1993 मध्ये भारत सरकारने ओबीसीं प्रर्गाला अधिकृतपणे एक वेगळा प्रवर्ग म्हणून मान्यता दिली होती

ओबीसी चा अर्थ काय आहे?

Other Backward Class हा ओबीसी चा अर्थ आहे आणि मराठीमध्ये अर्थ इतर मागास वर्ग आहे.

ओबीसीना काय लाभ मिळतात?

ओबीसींना शिक्षण, रोजगार आणि सरकारी सेवां या क्षेत्रात विविध प्रकारचे लाभ आणि आरक्षण मिळते. आणि तसेच त्यांच्या आर्थिक उन्नती करण्या साठी  विशेष योजना आणि अनुदानासाठीही ते पात्र आहेत

Leave a Comment