नमो शेतकरी योजना |  Namo Shetkari Yojana 2023 : संपूर्ण माहिती

Photo of author

By Team Master Marathi

नमो शेतकरी योजना :- जगात भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतात ७५% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्या योजनेचे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून दर वर्षाला या योजनेद्वारे ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या २०२३-२४  चा अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील १ कोटी १५ लाखाहून  अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तुम्ही जर  महाराष्ट्र राज्याचे शेतकरी असाल आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला हा लेख सविस्तर वाचावा लागेल.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 माहिती मराठी :

९ मार्च २०२३ रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करता असताना , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब  यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात येत असून, या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी  ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि  पात्र नागरिकांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून देण्यात येणारी आर्थिक मदत तीन सारख्या हप्त्यांमध्ये दिली जाईल. महाराष्ट्र  राज्य सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदतीची रक्कम पाठवली जाणार असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने ६९०० कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी ६९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 चे फायदे आणि वैशिष्ट्ये :

केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसारखीच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही योजना आहे. महाराष्ट्रातील  शेतकरी कुटुंबाला या योजनेच्या माध्यमामधून शासनाकडून वर्षाला ६००० रुपयांची मदत दिली जाणार आहे. आणि हि रक्कम शेतकरी लाभार्थीच्या बँक खात्यावर पाठवली जाईल. महाराष्ट्रामधील  शेतकऱ्यांना दर वर्षाला १२००० रुपयांच्या आर्थिक मदत मिळणार आहे. यामधील  ५०% भाग  महाराष्ट्र सरकार आणि बाकी ५०% भाग  केंद्र सरकार देणार आहे. या दोन्ही योजनांतुन राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला  एक हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा मदत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल. दर तीन महिन्यांनी लाभार्थींच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होतील.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत पात्रता :

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र असतील. शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची  जमीन असावी. अर्ज करणारा  शेतकरी सरकारच्या   कृषी विभागाकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. अर्ज करणाऱ्याचे  बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे बंधनकारक आहे.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे :

१. आधार कार्ड

२. पत्त्याचा पुरावा

३. उत्पन्न प्रमाणपत्र

४. बँक खाते विवरण

५. जमिनीचे दस्तऐवज

६. शेतीचे तपशील

७. पासपोर्ट आकाराचा फोटो

८. मोबाईल नंबर

अर्ज करण्याची  प्रक्रिया खालीलप्रमाणे :

महाराष्ट्रातील अर्जदाराला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे  यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत आतापर्यंत वेबसाइट सुरू केलेली नाही. आणि  या योजनेंचा  लाभ घेण्यासाठी अर्जासंबंधीची कोणतीही माहिती महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक केलेली नाही. या योजनेशी संबंधित माहिती मिळताच. आम्ही तुमच्या साठी या लेखाद्वारे माहिती देऊ. 

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana FAQ :

Q. नमो शेतकरी सन्मान निधी योजना २०२३ काय आहे ?

नमो शेतकरी महा सन्मान या योजनेअंतर्गत , प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून ६००० रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त, ६००० रुपये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. या योजनेसाठी लागणार खर्च  ६९०० कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सरकार उचलणार आहे.

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे २०२३ काय फायदे आहेत?

महाराष्ट्र राज्यातील या योजनेंतर्गत १ कोटी १५ लाखाहून अधिक  शेतकऱ्यांना ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पीएम किसान योजनेंपासून , त्यांना केंद्र सरकार कडून आधीच वार्षिक ६०००  रुपये मिळतात. आता महाराष्ट्रामधील  शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना  २०२३ मध्ये पात्रता काय आहे?

या योजनेची पात्रता म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असायला हवा . या योजनेंमध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र मानले जातील. या योजनेच्या अर्जदार शेतकऱ्याने शासनाच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असावे. 

Q.  नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२३ च्या अंमलबजावणीसाठी सरकारने किती बजेट ठेवले आहे?

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२३ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने ६९०० कोटी रुपये चे बजेट ठेवले  केले आहे.

Q.नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२३ ही योजना कार्यान्वित करण्याचा उद्देश काय आहे?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा महत्वाचा मुख्य उद्देश आहे. 

Leave a Comment