हरतालिका संपूर्ण माहिती hartalika mahiti in marathi

Photo of author

By Team Master Marathi

hartalika mahiti in marathi

हरतालिका संपूर्ण माहिती hartalika mahiti in marathi – भाद्रपद या मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका तीज साजरी केली जाते. सकाळपासूनच हरतालिकेच्या उपवासाची तयारी सुरू केली जाते. हरतालिकेचे हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या पतीचे दीर्घ आयुष्य लाभते. तसेच अविवाहित मुलींना लग्नासाठी योग्य असा जोडीदार मिळतो.

हरतालिका हा धार्मिक व्रत फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. पार्वतीसारखाच आपल्याला सुध्दा पती मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे हरतालिकेचे व्रत करतात. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. आज आपण या लेखामध्ये हरतालिका संपूर्ण माहिती hartalika mahiti in marathi बघणार आहोत.

हरतालिका नाव का ठेवले गेले? Why was it called Hartalika?

माता पार्वतीला शिव हाच आपला पती मिळावा म्ह्णून तिने खूप वर्ष तपश्चर्या केली होती. ज्यासाठी पार्वतीच्या मित्रांनी तिचे अपहरण केले होते. हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र म्हणूनच याला हरतालिका असे म्हटले जाते.

हरतालिका व्रत कथा मराठी hartalika puja katha in marathi

हिमालय राजाची कन्या पार्वती हि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करते. असं सांगितले जाते कि भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी 64 वर्ष पार्वतीने हे व्रत केलेलं असतं. हा प्रसंग खूप इतिहासातील प्राचीन म्हणजेच भगवान गणेशाच्या जन्माच्या आधीचा आहे.

पार्वती राजकन्या ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वैभवामध्ये वाढली. हिमालयाने ही कन्या विष्णूला अर्पण करायचं ठरवलं होतं. परंतु, पार्वतीला मात्र, वैभवा चा त्याग करून वैराज्याची ओढ लागली होती. आणि त्यामुळे तिने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तिने असं तिने व्रत केलं.

आणि हे व्रत करून पार्वतीला शिवाची प्राप्ती झाली.असे आपल्या मनामध्ये असलेले व्रत पूर्ण करण्यासाठी हरतालिका हे व्रत आहे.

हिमालयाची कन्या पार्वती हिने आपल्या वैभवाचा त्याग करून वनाचा स्वीकार केला आणि तिने कठोर तपश्चर्या केली,हि तपश्चर्या करताना तिला तिच्या मैत्रिणीने तपश्चर्या करताना मदत केली आणि ती पार्वती सोबत राहिली. म्हणून या हरतालिका या व्रतात ती पण वंदनीय आहे आणि तिची पण पूजा केली जाते.

हरतालिका पूजा काधी आहे 2023 hartalika teej 2023 date

हरतालिका तीज च्या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित कुमारिका भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात. सुखी विवाहित जीवन जावो यासाठी प्रार्थना करतात. हिंदू धर्मामध्ये हरतालिकेचे खूप महत्व् आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका साजरी केली जाते. यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये हरतालिका हि १८ सप्टेंबर २०२३ रोजी आहे.आणि या दिवशी महिला हरतालिकेचे व्रत करतील.

hartalika teej 2023 puja muhurat

हिंदू पंचागानुसार तृतीया तिथी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी सुरु होईल आणि १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी समाप्त होईल. १८ सप्टेंबर ला सकाळी हरतालिकेच्या पूजा मुहूर्त ६ वाजून ७ मिनिट ते ८ वाजून ३४ मिनिट इतका राहील. पूजेचा संपूर्ण वेळ हा २ घंटे २७ मिनिटांचा आहे.

हे देखील जाणून घ्या :  गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

हरतालिका पूजेची सामग्री Hartalika Teej Puja Samgri List

हरतालिकेच्या पूजेसाठी विविध सामग्री लागते. त्यामध्ये बेल पत्र, रेती, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र, 16 प्रकारच्या पत्री, पूजेसाठी फुलं, तसेच सौभाग्याचं साहित्य म्हणजे बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी साहित्य लागते.

तसेच तांदूळ, पाण्याचा कलश, चौरंग, रांगोळी, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, घंटा, समई, कापूरारती, आसन, निरांजन, शंख, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तेल तुपातील वात , अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी साहित्याची सामग्री पूजेसाठी आवश्यकता असते.

हरतालिका पूजा विधि मराठी hartalika teej puja vidhi marathi

पार्वती आणि सखी यांची मूर्ती आणि शिवलिंग यांची पूजा करतात किंवा वाळूचे शिवलिंग तयार करून सुद्धा पूजा केली जाते. सोळा उपचार पूजन,संकल्प,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य आणि कथेचे वाचन असे या हरतालिका पूजेचे विशेष स्वरूप असते. रात्री जागरण करून पूजा करतात. हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि आपला उपवास सोडतात.

Leave a Comment