22 जुलै हा आपल्या राष्ट्रध्वजासाठी ऐतिहासिक दिवस आहे, जाणून घेऊया भारताच्या तिरंगा ध्वजाचा इतिहास

Photo of author

By Team Master Marathi

India Flag

22 जुलै हा आपल्या राष्ट्रध्वजासाठी ऐतिहासिक दिवस : जेव्हा आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला जातो तेव्हा एक अभिमानाची भावना येते, जी एक भारतीय असल्याची भावना देते. 22 जुलैचा दिवस याच तिरंगा ध्वजासाठी ऐतिहासिक आहे. हा इतिहास भारतीय राष्ट्रध्वजाशी संबंधित आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात या तारखेला खूप विशेष महत्त्व आहे.

पहिल्यांदा तिरंगा 22 जुलै रोजी स्वीकारण्यात आला

22 जुलै 1947 रोजी दिल्ली मध्ये कॉन्स्टिट्यूशनल संविधान सभा होती . या संविधान सभेच्या सदस्यांच्या बैठकीत तिरंगा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला होता. या बैठकीत भारताचा ध्वज प्रस्तावित करण्यात आला. या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली आणि चर्चा होऊन भगवा, पांढरा आणि हिरवा ध्वज काही बदल करून स्वतंत्र भारताचा ध्वज बनवण्याचा सभेच्या सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

तिरंगा ध्वजामधील रंगांचे महत्त्व

भारताच्या सध्याच्या राष्ट्रध्वजाची म्हणजेच तिरंग्याची  रचना करण्याचे श्रेय स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांना जाते. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या ध्वजावर लाल आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते, जे भारतातील दोन प्रमुख धर्मांचे प्रतिनिधित्व करतात. 1921 मध्ये पिंगळी हे घेऊन गांधीजींकडे गेले तेव्हा त्यांनी ध्वजात पांढरा रंग आणि चरखा घालण्याचा सल्ला दिला. पांढरा रंग हा  देशातील इतर धर्मांचे आणि चरखा स्वदेशी चळवळीचे असण्याचे प्रतिनिधित्व करतो.

हा तिरंगा पहिल्यांदा 1923 मध्ये वापरण्यात आला होता

नागपुरात शांततापूर्ण आंदोलनात हजारो लोकांनी 1923 मध्ये हा ध्वज हातात घेतला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा दुसऱ्या महायुद्धात हा ध्वज वापरला होता. तथापि,भारतीय नागरिकांना राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी नव्हती. भारतातील नागरिकांना राष्ट्रीय सण वगळता इतर कोणत्याही दिवशी त्यांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी नव्हती.भारतीय ध्वज संहितेत  2002 मध्ये बदल करण्यात आले. आता भारतातील प्रत्येक नागरिक आपल्या घर, दुकान, कारखाना आणि कार्यालयात कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज स्वाभिमानाची फडकवू शकतो.

भारत स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, त्यानिमित्त आपल्या  देशातील प्रत्येक घराघरात मध्ये  तिरंगा मोहीम साजरी करण्यात आली. यावेळी सर्वांनी घर, कार्यालय, वाहन, उंच इमारतीवर सर्वत्र तिरंगा फडकावून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Comment