15 ऑगस्ट भाषण | 15 AUGUST SPEECH IN MARATHI 2023 |Independence Day

Photo of author

By Team Master Marathi

15 ऑगस्ट भाषण15 ऑगस्ट भाषण

15 ऑगस्ट भाषण 2023

15 ऑगस्ट भाषण : सन्माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर व जमलेले माझे वर्गमित्र आणि मैत्रिणीनो.

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे हे आपण कधी विसरू शकणार नाही. आपल्या भारत देशावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले.या दीडशे वर्षाच्या काळात भारतीयांचे खूप शोषण केले.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनालो तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. हा दिवस आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देन्या हेतूने भाषण केले ते म्हणाले सर्व लोक झोपत आहे. आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पाहट होणार आहे. सर्वाना स्वातंत्र्याचा खूप खूप शुभेच्छा.

आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान , शेती , तंत्रज्ञान , आरोग्य , शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. 15 ऑगस्ट या आपल्या राष्ट्रीय सणा दिवशी प्रत्येक जण आनंदी असतो. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात येतो सर्वत्र देशभक्तीपर गीते गायली जातात देशभक्तीपर भाषणे केले जातात

आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे पण त्याच बरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला भेडसावत आहे . महागाई, भ्रष्टाचार दहशतवाद, जातिवाद ,व्यसन ,अत्याचार या सर्व समस्या आपल्यासमोर उभे आहे

अनेक अडचणी मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातून नष्ट केल्या पाहिजेत आणि आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल

तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

speech on 15 august in marathi । Independence Day in Marathi

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांचा,

ज्यांनी भारत देश घडवला.

सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित माझ्या प्रिय देश बांधवांनो सर्वांना माझा नमस्कार

आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण आज येथे भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 

मित्रांनो 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे.

15 ऑगस्ट 1947 इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला दिवस  भारताच्या इतिहासातील सुवर्ण जीवन होय.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले.

महात्मा गांधी,पंडित नेहरू ,लोकमान्य टिळक ,भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव राणी लक्ष्मीबाई ,सरदार वल्लभभाई पटेल, मंगल पांडे अशा अनेक क्रांतिकारकांनी प्राण पणाला लावले. 

आज आपण मुक्तपणे श्वास  घेतोय त्याचे सर्व श्रेय या देश पुत्रांचे आहे अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन…

आजच्या या मंगल दिवसाला आपल्या  भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवितात. हा दिवस मोठ्या उत्साहात शाळा महाविद्यालयात साजरा केला जातो.  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मिरवणुका काढल्या जातात, घोषणा दिल्या जातात सगळीकडे देशभक्ती चे गाणे लावली जातात. 

स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे विविधतेतील एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे.  परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहे त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे

मी एक छोटीशी कविता बोलून माझे भाषण संपवतो

तिरंगा आमचा भारतीय झेंडा,

उंच उंच भडकवू,

प्राणपणाने लढून आम्ही,

शान याची वाढवू. 

जय हिंद जय भारत

Leave a Comment